संगमेश्वरात एलईडी दिव्यांचा झगमगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:06+5:302021-09-24T04:16:06+5:30

या भागातील नगरसेवक सखाराम घोडके यांनी संपूर्ण प्रभागासाठी ३२५ एलईडी दिवे मंजूर केले आहेत. त्यापैकी ७० दिवे ...

LED lights in Sangameshwar | संगमेश्वरात एलईडी दिव्यांचा झगमगाट

संगमेश्वरात एलईडी दिव्यांचा झगमगाट

या भागातील नगरसेवक सखाराम घोडके यांनी संपूर्ण प्रभागासाठी ३२५ एलईडी दिवे मंजूर केले आहेत. त्यापैकी ७० दिवे दिवे लावण्यात आले आहेत. यासाठी सुमारे २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजाराम जाधव यांनी आपल्या नगरसेवक निधीतून १५५ एलईडी दिवे मंजूर केले आहेत. ५५ दिवे लावले आहेत. आगामी काळात १०० दिवे लावण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूलही या दिव्यांनी प्रकाशमान झाला आहे. महापालिकेकडून जसजसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे उर्वरित दिवे लावण्यात येतील, असे नगरसेवक जाधव यांनी सांगितले. दिव्यांच्या शुभ्र प्रकाशाने प्रत्येक चौक, गल्ली बोळ उजळून निघाला आहे. त्यामुळे चोरट्यांना आपोआप चाप बसणार आहे.

गेल्या वर्षभरापूर्वीच या दिव्यांना महासभेने मंजुरी दिली होती. मात्र एलईडी दिवे पुरविणाऱ्या कंपनीला महापालिकेकडून पेमेंट अदा न केल्याने दिव्यांचा पुरवठा होऊ शकला नव्हता. मात्र वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेने पेमेंट अदा करताच दिवे पुरविण्यात आले.

Web Title: LED lights in Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.