चांदवड : येथील एस.एन. जे. बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकेनिकल विभागातर्फे क्रेझी बाईकर्स या विषयावर चार दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेत मॅकेनिकल विभागातील १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या कार्यशाळेत टु-व्हिलर गाडीचे सर्व पार्टची खोलणी व जोडणी तसेच त्यांचे संपुर्ण कार्य कसे चालते या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना प्रा. पी. डी. बागमार यांनी दिली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.जे.गोंड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागप्रमुख प्रा. एम.एम. राठोड, प्रा. एस. यु. पाटील व सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. ( वाणिज्य प्रतिनिधी )
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}