राजोळेवस्ती शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘वुई लर्न इंग्लिश’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:27 IST2019-09-17T22:50:53+5:302019-09-18T00:27:23+5:30
इंग्रजी विषयाची कौशल्ये शालेय स्तरावर विकसित करणे गरजेचे आहे. या विषयाचे अध्ययन अध्यापन करताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. मुले इंग्रजी वाचतात, लिहितात पण बोलत नाहीत. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राजोळेवस्ती शाळेचे प्रयोगशील शिक्षक पांडुरंग देवरे व यशस्वी कुंभार्डे यांनी इंग्रजी विषयाची आवश्यक कौशल्ये शाळास्तरावर विकसित करण्याचा चंग बांधला आहे.

राजोळेवस्ती शाळेत खेळाद्वारे इंग्रजी शब्द विद्यार्थी वापरत आहे.
सायखेडा : इंग्रजी विषयाची कौशल्ये शालेय स्तरावर विकसित करणे गरजेचे आहे. या विषयाचे अध्ययन अध्यापन करताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. मुले इंग्रजी वाचतात, लिहितात पण बोलत नाहीत. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राजोळेवस्ती शाळेचे प्रयोगशील शिक्षक पांडुरंग देवरे व यशस्वी कुंभार्डे यांनी इंग्रजी विषयाची आवश्यक कौशल्ये शाळास्तरावर विकसित करण्याचा चंग बांधला आहे. शाळेने ‘वुई लर्न इंग्लिश’ या नावाने हा उपक्र म सुरू केला असून, यात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे. राजोळेवस्ती शाळेने साकारलेल्या उपक्रमाचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी शिक्षकांना निश्चित फायदा होईल. या कार्यक्र मास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उपक्र माबद्दल अगदी पहिलीच्या चिमुकल्या बालकापासून ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. इंग्रजी भाषा सोपी कशी शिकविता येईल हाच उद्देश या उपक्रमाचा असणार आहे. उपक्रमास गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख वाघ यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मुख्याध्यापक पांडुरंग देवरे व शिक्षक यशस्वी कुंभार्डे या उपक्रमाचे संयोजन करीत आहेत.
काय आहे उपक्रम...
इयत्ता वार या विषयाच्या क्षमता मुलांमध्ये विकसित करणे, बालकांची शब्द संपत्ती वाढविणे, बालवयातच इंग्रजी वाचनाची गोडी लावणे, संवाद कौशल्ये वाढीस लावणे, इंग्रजी बोलण्याविषयी आत्मविश्वास निर्माण करणे, सभाधीटपणा निर्माण करणे आदीसाठी कृतियुक्त अध्यापन पद्धतीचा पुरेपूर उपयोग या प्रकल्पात करण्यात आला असून, इतर शाळांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी या उपक्र मांतर्गत शाळा स्वनिर्मित व्हिडीओ निर्मिती करीत असून, या विषयाचे अध्यापन कृतिशील, रंजक करण्याचा प्रयत्न शाळेचा राहणार आहे. अक्षर वाचन, शब्द वाचन, छोटी वाक्ये वाचन, छोटा उतारा वाचन, यात विविध छोट्या-छोट्या अॅक्टिव्हिटींचा समावेश करून मुलांची या विषयाची तयारी करून घेतली जाणार आहे. छोटे घटक घेऊन त्यांचे नाट्यीकरण करीत मुलांना सहज, सोप्या भाषेत घटकाचे स्पष्टीकरण केले. णार आहे. यासाठी शाळेने विषयाशी संबंधित शैक्षणिक साहित्यनिर्मिती केली आहे. या अॅक्टिव्हीटींचे व्हिडीओ यू-ट्यूबच्या माध्यमातून इतर शाळांपर्यंत पोहोच केले जात आहेत.