यंदा पीककर्ज वाटपात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 09:34 PM2020-09-03T21:34:51+5:302020-09-04T00:53:09+5:30

जिल्ह्यात खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. सटाण्यात पीककर्ज वितरणात तलाठ्यांचा अडसर आला. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या वस्तुस्थितीचा घेतलेला धांडोळा...सटाणा तालुक्यात तलाठ्यांची नकारघंटा...

Leading in peak debt allocation this year | यंदा पीककर्ज वाटपात आघाडी

यंदा पीककर्ज वाटपात आघाडी

Next
ठळक मुद्दे१ खरीप हंगाम : जिल्हा बॅँकेबरोबरच राष्टÑीयीकृत बॅँकांना उद्दिष्ट; काही ठिकाणी अडचणी

जिल्ह्यात खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. सटाण्यात पीककर्ज वितरणात तलाठ्यांचा अडसर आला. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या वस्तुस्थितीचा घेतलेला धांडोळा...सटाणा तालुक्यात तलाठ्यांची नकारघंटा...
सटाणा : तालुक्यात दीड हजार शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून, बहुतांश ठिकाणी मात्र दांडीबहाद्दर तलाठ्यांमुळे कागदपत्रांअभावी बहुतांश शेतकरी पीककर्जापासून वंचित राहात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
बागलाण तालुक्यात सुमारे ७ हजार ६७२ शेतकºयांना ६६ कोटी ७८ लाख ९६ हजार ८३२ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. असे असतानादेखील अत्यल्प शेतकºयांना पीककर्ज मिळाल्याचे बघायला मिळत आहे. जिल्हा बँकेने दीड हजार शेतकºयांना आत्तापर्यंत ११ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे, तर राष्टÑीयीकृत बॅँकांकडून पीककर्जाचे आकडे लपविले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची बँकांकडून अडवणूक केली जात आहे. सटाणा येथील म्हाळसाई वि.का.सोसायटीने एकाही शेतकºयाला कर्जाचा पुरवठा केलेला नाही. आराई, शेमळी नवी व जुनी, मळगाव, ढोलबारे, मुंगसे येथे प्रत्येकी एका शेतकºयाला पीककर्ज देण्यात आले आहे.पुनर्गठनची आवश्यकताबागलाण तालुक्यात २०१८-१९ मध्ये दुष्काळ पडला तर २०१९ अखेरीस अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपासह द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केलेला खर्चदेखील भरून न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. या अस्मानी संकटामुळे बहुतांश शेतकºयांना बँकांकडून घेतलेले पीककर्ज फेडता आले नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना नव्याने पीककर्ज मिळू शकले नाही. त्यामुळे शासनाने पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. दांडीबहाद्दर तलाठ्यांची आडकाठी ...तालुक्यातील भिलवाड, देवठाण दिगर, जाखोड, तुंगण दिगर, शेवरे, माळीवाडा, अंबापूर, जमोठी, यशवंतनगर, अजमीर सौंदाणे, देवळाणे, सुराणे, वायगाव आदी भागातील शेतकºयांना दांडीबहाद्दर तलाठ्यांमुळे कर्ज अर्ज सादर करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागले असून, त्याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.निफाड : ७० कोटी ९२ लाख
९३ हजार रुपयांचे कर्जवाटप
निफाड तालुक्यात जिल्हा बँकेच्या वतीने शेतकºयांना १ एप्रिल ते १३ आॅगस्ट या कालावधीत ७० कोटी ९२ लाख ९३ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेने निफाड तालुक्यातील १३३ विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना पीककर्ज वाटप केले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पिकाच्या नोंदणीवरून पीकविमा, कर्जवाटप केले जाते. बँक कांदा पिकासाठी एकरी ३० हजार रुपये, सोयाबीन पिकासाठी १६,८०० रुपये, द्राक्ष पिकासाठी एकरी १ लाख १०, मका पिकासाठी एकरी १५ हजार, उसासाठी एकरी ३५ हजार रुपयेपीककर्ज देण्यात येत आहे. निफाड तालुक्यासाठी ११० कोटी रुपये कर्ज वाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. दि. १ एप्रिल ते १३ आॅगस्ट या कालावधीत ४६७१ सभासदांना ७० कोटी ९२ लाख ९३ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.पीककर्ज वाटप करताना बºयाच अडचणी येत असतात. शेतकºयांच्या सातबारा उताºयावर राष्टÑीयीकृत व इतर बँकांचा बोजा असल्यास पीक कर्ज देताना अडचण येते. सामायिक सातबारा उताºयावर आणेवारी नसल्यास पीककर्ज वाटप करताना अडचणी येतात. सिन्नर : ६३ कोटी
७१ लाखांचे वितरण
सिन्नर तालुक्यात राष्टÑीयीकृत, ग्रामीण व खासगी बॅँकांसह जिल्हा बॅँकेकडून खरीप कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. तालुक्यातील सुमारे ४६४० शेतकºयांना सुमारे ६३ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यात सन २०२०-२१ खरीप कर्जाचे वाटप लक्ष्यांक ठेवण्यात आले होते. राष्टÑीयीकृत, खासगी व ग्रामीण बॅँकांनी २०८ कोटी २२ लाख रुपयांचे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने १४ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे लक्ष्यांक ठेवले होते. कर्जवाटपाचे उद्दिष्ट समोर ठेवून कर्जवाटप करण्यात येत होते. यापैकी राष्टÑीयीकृत, खासगी व ग्रामीण बॅँकांनी २ हजार ४१५ सभासदांना ५३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅँकेने २ हजार २२५ शेतपकºयांना आत्तापर्यंत १० कोटी ७० हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. एकूण ४ हजार ६४० शेतकºयांना ६३ कोटी ७१ लाख म्हणजे २८.६७ टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे.त्र्यंबकेश्वर : तालुक्यात
कागदपत्रांची अपूर्तता
त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकूण २३,८०० शेतकरी खातेदार असले तरी किसान क्रेडिट कार्डअंतर्गत फक्त १५६४ शेतकरी कर्जमाफीस पात्र असल्याने त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने काही शेतकºयांनी गरज असतानाही पीककर्जाकडे पाठ फिरवली आहे.
तालुक्यात किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत १५६४ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून, या शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्डपासून वंचित आहेत, परिणामी ते कर्ज घेण्यास पात्र ठरत नाही. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यासाठी ११ कोटी ९३ लाख ९ हजार ६७२ रुपये मंजुर झाले आहेत. ही योजना फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. तालुक्यात १९ आदिवासी सहकारी संस्था व सात विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यात येत आहे. दिंडोरीत ४२ टक्के शेतकºयांना फायदादिंडोरी तालुक्यात बँकां-मार्फत पीककर्ज वाटप सुरू असून, तालुक्यासाठी खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ४० कोटी ७२ लाख असून, पैकी १७ कोटी रुपये म्हणजेच ४२ टक्के कर्जवाटप झाले आहे. दिंडोरी तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १२९६ सभासदांना १०,६०० लाख खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ४४१५.०१ लाख असे एकूण ४१.६५ टक्के कर्जवाटप झाले आहे.
२राष्ट्रीयीकृत बँकांचे २६२२ लाभार्र्थी खातेदार असून, ३०१२७.९३ लाख पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, पैकी १२,५२१.०६ असे एकूण ४१.५६ टक्के कर्जवाटप झाले आहे. जिल्हा बँक व राष्टÑीयीकृत बँकांचे एकूण ३९१८ खातेदार असून, ४०,७२७.९३ लाख पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. पैकी १६,९३६.०७ असे एकूण ४१.५८ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. सर्व बँकांकडे कर्ज निधी उपलब्ध असून, आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच कर्जवाटप सुरू आहे.येवला : हजारावर शेतकºयांना फायदा
येवला तालुक्यातील सुमारे चार हजार शेतकºयांना खरीप हंगामासाठी ४४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याने शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत तालुक्यातील १९ हजार शेतकºयांना २०० कोटी रुपयांचा लाभ मिळून शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. खरीप हंगामासाठी येवला तालुक्याला ६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला खरीप हंगामासाठी ३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, जिल्हा बँकेच्या वतीने दोन हजार १७६ शेतकºयांना १४ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे, तर राष्टÑीयीकृत बँकांसाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या बँकांनी १ हजार ६३९ शेतकºयांना
२९ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला खरा; मात्र यानंतर शेतीसाठी कर्ज मिळेल किंवा नाही याबाबत शेतकरीवर्गाला चिंता लागून होती. राज्य शासनाने मागणीनुसार पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारल्याने याचा शेतकºयांना लाभ होत आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेव्यतिरिक्त ज्या काही शेतकºयांकडे थोडीफार बाकी आहे, अशा शेतकºयांनी बाकी जमा केल्यास असे शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरत आहे.नांदगाव : ४७७ शेतकºयांना ३ कोटी ८३ लाखांचे वितरणनांदगाव तालुक्यात सुमारे ११ हजार खातेदार शेतकरी आहेत. यंदा शेतकºयांनी वित्तीय संस्थांकडे पाठ फिरविल्याने कर्जवाटपाचे उद्दिष्ट अद्याप गाठता आलेले नाही. मार्चपासून कोरोना साथ आल्यामुळे कर्जवाटप मागे पडले. तालुक्यात पावसाला वेळेत सुरुवात झाल्याने तालुक्यातली पिके जोमात आहेत. गेल्या वर्षी कांद्याला चांगला दर मिळाला होता. त्याचाच पैसा हातात असल्याने बहुतांश शेतकरी कर्ज घेण्यामागे पळताना दिसून येत नाहीत. राष्टÑीयीकृत बँकांनी दोन हजार ३३८ शेतकºयांना २५ कोटी ७० लाख ३६ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार अडचणीत असल्याने त्यांना खरीप पीककर्ज वाटपाचा १६ कोटी रुपयांचा लक्ष्यांक ठरवून देण्यात आला असला तरी आतापर्यंत ४७७ शेतकºयांना ३ कोटी ८३ लाख ८३ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
तालुक्याला बँक आॅफ महाराष्ट्र ही अग्रणी बँक म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. महाराष्टÑ बँकेकडून १०५० खातेदारांना १२ कोटी ३५ लाख ३५ हजार रुपयांचे खरीप कर्ज, स्टेट बँक आॅफ इंडियाकडून १३७ खातेदारांना १ कोटी २० लाख ७० हजार रुपये कर्ज, बँक आॅफ इंडियाने ६ कोटी
५६ लाख रुपये (बोलठाण).

Web Title: Leading in peak debt allocation this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.