पाणी पळवापळवीची सभागृह नेत्यांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST2019-12-18T23:56:22+5:302019-12-19T00:05:36+5:30
परिसरात कृत्रिम पाणीटंचाई आणि पळवापळवीने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पाणी पळवापळवीची सभागृह नेत्यांकडून दखल
इंदिरानगर : परिसरात कृत्रिम पाणीटंचाई आणि पळवापळवीने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच परिसरात ज्यादा दाबाने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे . नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. नळास बारीक धार पाणी येते, त्यामुळे पिण्यासाठीदेखील पुरेस पाणी मिळत नाही. धरणांमध्ये जलसाठा मुबलक असतानाही पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, महारु द्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरु णोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, एलआयसी कॉलनी, शास्त्रीनगर, परबनगर, सन्मित्र वसाहत, बजरंग सोसायटी यांसह परिसरात नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
या वृत्ताची दखल घेत सभागृहनेता सतीश सोनवणे, आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक श्याम बडोदे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, अभियंता गोकुळ पगारे, विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यासोबत बैठक घेतली. परिसरात उच्चदाबाने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.