शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

कायदा नसल्याने अधिकार मर्यादित

By admin | Updated: June 5, 2014 01:05 IST

नाशिक : आयुर्वेद डॉक्टरांचा अभ्यासक्रम, त्यांचे विषय आणि त्यांना करावी लागणारी इंटर्नशिप यामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाप्रमाणेच शिक्षणक्रम आहे.

नाशिक : आयुर्वेद डॉक्टरांचा अभ्यासक्रम, त्यांचे विषय आणि त्यांना करावी लागणारी इंटर्नशिप यामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाप्रमाणेच शिक्षणक्रम आहे. मात्र केवळ कायद्याचे संरक्षण नसल्यामुळे आयुर्वेद डॉक्टरांवर अनेक मर्यादा आल्या आहेत. सर्वांत मोठा प्रश्न आहे तो शस्त्रक्रिया आणि उपचारपद्धतीचा. मुळात देशात वैद्यकीय क्षेत्राची जननी आयुर्वेदाला मानण्यात आलेले आहे. असे असतानाही अ‍ॅलोपॅथीच्या वर्चस्वामुळे आयुर्वेदाविषयी सध्या अनेक वावड्या उठविल्या जात असल्याचा आरोप ‘अस्तित्व परिषद’ संघटनने केला आहे. आयुर्वेदातील सुश्रृत मध्ये सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया कशा प्रकारे कराव्यात हे नमूद केलेले आहे. असे असतानाही आयुर्वेदाच्या एम.एस. डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी वेळोवेळी कायद्याचा धाक दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये काहीसी असुरक्षिततेची भावना आहे. खरेतर पुणे येथील टिळक महाविद्यालय, मुंबईतील पोतदार महाविद्यालय आणि नाशिकमधील आयुर्वेद महाविद्यालय यांत अनेक शस्त्रक्रिया झालेल्या आहेत व आजही होत आहेत. परंतु तरीही काही वैद्यकीय संघटना याविरुद्ध आवाज उठवत असून, न्यायालयात जाण्याची भाषा करीत असतात. आयुर्वेद डॉक्टरांना वंचित ठेवले जात असल्याचा आणखी एक पुरावा द्यायचाच झाला तर सरकारच्या आरोग्य कार्यक्रमाचा देता येईल. केंद्र अथवा राज्य शासनाकडून राबविण्यात येणार्‍या प्रशिक्षण कार्यक्रमातून आयुर्वेद डॉक्टरांना डावलले जाते. शासनाच्या कुटुंब नियोजन, गर्भपात, कुपोषण, नसबंदी तसेच इतर आरोग्यविषयक कार्यक्रमात आयुर्वेद डॉक्टरांना सामावून घेतले जात नाही. २००६ पर्यंत आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शासनाच्या राष्टÑीय कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात होते. २००६ नंतर मात्र कोणतेही कारण न देता अशा डॉक्टरांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. आजही हीच परिस्थिती असून, एमडीएमएस डॉक्टरांना शासकीय सेवत सामावून घेण्यास आडकाठी केली जात आहे. एमडी एमएस हा अभ्यासक्रम बीएएमएसनंतर तीन वर्षांसाठीचा असून त्यास सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिनने अभ्यासक्रम ठरवून मान्यता दिलेली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत हे कोर्सेस अधिकृतरीत्या राबविले जातात. तरीही आयुर्वेदाच्या एमडीएमएसच्या विद्यार्थ्यांना डावलले जात असल्याने त्यांच्या शासकीय नोकरीचा आणि खासगी प्रॅक्टीसचा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)