शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लाँड्रीचालकाने केले दहा हजार परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:23 IST

कळवण : पैसा सर्वांनाच प्यारा असतो. त्यातच जर पैसे सापडले तर नशीब फळफळले किंवा लॉटरी लागल्याचा आनंद पैसे सापडणाऱ्या व्यक्तीला होतो. मात्र याला अपवाद ठरला कळवण येथील एक लाँड्रीचालक. त्याने कोणत्याही लोभाला बळी न पडता ग्राहकाचे कपड्याबरोबर आलेले चक्क दहा हजार रुपये परत केले.

ठळक मुद्देकळवण : प्रामाणिकपणाबद्दल सत्कार

कळवण : पैसा सर्वांनाच प्यारा असतो. त्यातच जर पैसे सापडले तर नशीब फळफळले किंवा लॉटरी लागल्याचा आनंद पैसे सापडणाऱ्या व्यक्तीला होतो. मात्र याला अपवाद ठरला कळवण येथील एक लाँड्रीचालक. त्याने कोणत्याही लोभाला बळी न पडता ग्राहकाचे कपड्याबरोबर आलेले चक्क दहा हजार रुपये परत केले.कळवण येथील ओतूर रोड परिसरात पाण्याच्या टाकीजवळ गेल्या अनेक वर्षांपासून रमेश बोरसे हे लाँड्रीचा ( इस्त्री ) व्यवसाय करतात. बोरसे यांनी त्यांच्याकडे सतत इस्त्रीसाठी कपडे देणारे सेवानिवृत्त प्राचार्य ए. डी. मोरे यांच्या इस्त्रीसाठीच्या पँटच्या खिशात दहा हजार रुपयांची रोकड सापडल्याने त्यांनी ती प्रामाणिकपणे मोरे यांना परत केली.नजरचुकीने मोरे यांच्याकडून इस्त्रीसाठी दिलेल्या एका पँटच्या खिशात सदर रक्कम राहून गेली होती. कपडे इस्त्रीला देण्यात आले असले तरी त्यात पैसे आहेत, ही बाब मोरे यांच्या लक्षात आली नाही. मात्र, कपडे इस्त्री करायला घेताच बोरसे यांना पँटच्या खिशात काहीतरी असल्याचे निदर्शनास आले. पाहतात तर खिशात चक्क दहा हजार रुपये होते ! बोरसे यांनी मोह आवरत हाती लागलेले दहा हजार मोरे यांना प्रामाणिकपणे परत केले. आजच्या या कलियुगात बोरसे यांनी दहा हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. यापूर्वीही विसपुते नामक ग्राहकाच्या खिशात असलेले चार ग्रॅम सोने त्यांनी प्रामाणिकपणे परत केले होते. प्रामाणिक माणसांच्या तुटवड्यात ही घटना अनुभवास येताच प्राचार्य मोरे यांच्या वतीने बोरसे यांचा शाल, श्रीफळ देत सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश भोसले, उद्धव सोनजे, दिलीप पगार, राजेंद्र जाधव, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Grammy Awardsग्रॅमी पुरस्कारSocialसामाजिक