सिन्नरला संकल्प माथाडी कामगार शाखेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:52 IST2019-01-13T17:52:30+5:302019-01-13T17:52:45+5:30
सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत संकल्प माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन या शाखेचा उद्घाटन सोहळा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

सिन्नरला संकल्प माथाडी कामगार शाखेचा शुभारंभ
सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत संकल्प माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन या शाखेचा उद्घाटन सोहळा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
नाशिक- पुणे महामार्गावरील जिंदाल फाट्याजवळील सर्वज्ञ संकुलात जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत व आमदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यालयाची फित कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, माजी सरपंच संजय सानप, सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, दत्तू आव्हाड, शंकरराव शेळके, कैलास बर्के, आनंदा शेळके आदींसह मान्यवर उपस्थित होते. संकल्प माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष राजेश्वर कांगणे, सरचिटणीस एकनाथ कांगणे, आनंद कांगणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आमदार वाजे व अध्यक्ष सांगळे यांनी माथाडी कामगार युनियनच्या कार्यालयास शुभेच्छा दिल्या. यावेळी खजिनदार सचिन बर्के, कार्यकारी अध्यक्ष गणेश शेळके, विजय दौंड, सुमीत सोनवणे, सागर सानप, विजय सानप, योगेश्वर लोणारे, अनिल लोंढे आदींसह माथाडी कामगार युनियनचे सदस्य उपस्थित होते.