इगतपुरीत 'संकल्प अभियानाचा' शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 00:19 IST2021-06-20T00:18:35+5:302021-06-20T00:19:28+5:30

आहुर्ली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 'संकल्प अभियान' इगतपुरी येथे राबविण्यात आले.

Launch of 'Sankalp Abhiyan' in Igatpuri | इगतपुरीत 'संकल्प अभियानाचा' शुभारंभ

राहूल गांधींच्या वाढदिवसानिमित्त गरजु महिलाना साहित्य वाटप करताना भास्कर गुंजाळ, उत्तम भोसले, रामदास मालुंजकर, रमेश जाधव, देवराम नाठे, सविता पंडीत, सत्तार मणियार, किरण पागेरे उत्तम भोसले, रामदास मालुंजकर, रमेश जाधव, देवराम नाठे, विता पंडीत, सत्तार मणियार, किरण पागेरे आदी.

ठळक मुद्देराहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

आहुर्ली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 'संकल्प अभियान' इगतपुरी येथे राबविण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या पुढाकारातून गोरगरीब व गरजू अशा शंभर आदिवासी महिलांना जीवनावश्यक घरगुती साहित्याचे यावेळी वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे, तर व्यासपीठावर युवक भास्कर गुंजाळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले, रामदास मालुंजकर, माजी सरपंच रमेश जाधव, जेष्ठ नेते देवराम नाठे, महिला अध्यक्ष सविता पंडीत, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सत्तार मणियार, किरण पागेरे आदी होते.

यावेळी गुंजाळ, उघाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास इगतपुरी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस कैलास घारे, योगेश सुरुडे, अहिरे, कुणाल मोरे, किरण रायकर, संदीप भागडे, मोहन भागडे, इगतपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कौटेइगतपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कौटे, रामचंद्र कडू यांच्यासह महिला उपस्थित होते.
 

Web Title: Launch of 'Sankalp Abhiyan' in Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.