पेठ तालुक्यात आॅक्सीमित्र अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 16:00 IST2020-09-09T15:59:04+5:302020-09-09T16:00:31+5:30

पेठ : कोरोनाच्या संसर्गामूळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळीच जागरूक राहण्यासाठी व आॅक्सीजन लेव्हल तपासणी करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने तालुक्यात आॅक्सीमित्र अभियान राबवण्यात येत आहे.

Launch of Oxymitra campaign in Peth taluka | पेठ तालुक्यात आॅक्सीमित्र अभियानास प्रारंभ

आम आदमी पार्टीच्या वतीने पेठ तालुक्यात आॅक्सीजन लेव्हल तपासणी करतांना आॅक्सी मित्र.

ठळक मुद्देआम आदमी पार्टीच्या वतीने गावोगावी नागरिकांची केली जातेय तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : कोरोनाच्या संसर्गामूळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळीच जागरूक राहण्यासाठी व आॅक्सीजन लेव्हल तपासणी करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने तालुक्यात आॅक्सीमित्र अभियान राबवण्यात येत आहे.
शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला असून खेड्या-पाड्यावरील जनतेला वेळीच सावध करून उपाययोजना करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने प्रत्येक गावात आॅक्सीमित्र नेमण्यात आले असून आॅक्सीमीटरच्या सहयाने आॅक्सीजन लेव्हल तपासून योग्य आरोग्य विषयक मोफत मार्गदर्शन केले जात आहे.
आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटनमंत्री तथा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ तालुक्यात कोहोर, निरगुडे, उस्थळे, हनुमंतपाडा, देवगाव, भायगाव, इनामबारी, मंगोने या गावी आॅक्सिमीटरद्वारे तपासणी सुरू आहे.
आॅक्सिमित्र म्हणून यशवंत राऊत, उमेश भोये, नितीन राऊत, योगेश वाघेरे, निकिता राऊत, मनोहर गवळी, यशवंत खंबाईत आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. (फोटो ०९ पेठ ०१)

 

Web Title: Launch of Oxymitra campaign in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.