"एक व्यक्ती एक वृक्ष" अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:40 IST2021-06-20T22:18:48+5:302021-06-21T00:40:29+5:30
लोहोणेर : कोरोना महामारी काळात ऑक्सिजनचा प्रश्न सर्वत्र भेडसावत होता. त्यामुळे वृक्षलागवडीचे महत्त्व लक्षात आल्याने खालप येथील काही युवकांनी "एक व्यक्ती, एक वृक्ष" संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. युवकांनी रविवारी (दि.२०) ह्यएक व्यक्ती एक वृक्षह्ण लागवडीच्या मोहिमेस प्रारंभ केला असून ४०१६ वृक्षलागवड करून संगोपन करण्याचा निर्धार केला आहे.

"एक व्यक्ती एक वृक्ष" अभियानास प्रारंभ
ठळक मुद्दे४०१६ वृक्षलागवड करून संगोपन करण्याचा निर्धार
लोहोणेर : कोरोना महामारी काळात ऑक्सिजनचा प्रश्न सर्वत्र भेडसावत होता. त्यामुळे वृक्षलागवडीचे महत्त्व लक्षात आल्याने खालप येथील काही युवकांनी "एक व्यक्ती, एक वृक्ष" संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. युवकांनी रविवारी (दि.२०) ह्यएक व्यक्ती एक वृक्षह्ण लागवडीच्या मोहिमेस प्रारंभ केला असून ४०१६ वृक्षलागवड करून संगोपन करण्याचा निर्धार केला आहे. या अभियानात वृक्षमित्र गोवर्धन सूर्यवंशी, रोशन पाटील, विवेक जाधव, रोहित काकुळते, यश जोशी, अविनाश सूर्यवंशी, वसंत सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, जिभाऊ सूर्यवंशी, दिनेश सोनार आदी सहभागी झाले आहेत.