सटाण्यात मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:56 PM2018-12-14T13:56:04+5:302018-12-14T13:56:26+5:30

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वखार महामंडळाच्या आवारात मका खरेदी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला.

Launch of Maize Purchase Center in the Stack | सटाण्यात मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

सटाण्यात मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

Next

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वखार महामंडळाच्या आवारात मका खरेदी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. तहसीलदार प्रमोद हिले अध्यक्षस्थानी होते. बाजार समितीचे उपसभापती सरदारसिंग जाधव, दक्षिण सोसायटीचे अध्यक्ष भिका सोनवणे, उपाध्यक्षा द्वारका सोनवणे, बाजार समतिीचे संचालक केशव मांडवडे, संजय बिरारी, नरेंद्र अिहरे, श्रीधर कोठावदे, प्रवीण सोनवणे, सहाय्यक निबंधक महेश भंडागे, मनोहर देवरे, पांडुरंग सोनवणे,बाजार समतिीचे सचिव भास्कर तांबे, मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी दिलीप भामरे, वखार महामंडळाचे शाखा अधीक्षक पी. एन. जगताप आदि उपस्थित होते. यंदाच्या खरीप पणन हंगाम करता राज्यातील शेतक-यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा तसेच शेतक-यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मका, गहू, बाजरी ही भरड धान्य व धानाची खरेदी करण्यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. शासनाने मक्याला सतराशे रु पये आधारभूतकिंमत जाहीर केली आहे. सटाणा बाजार समिती व दक्षिण भाग सोसायटीतर्फे आधारभूत किमतीने मका खरेदी केला जाणार आहे.

Web Title: Launch of Maize Purchase Center in the Stack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक