रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:25 IST2020-10-21T23:26:04+5:302020-10-22T00:25:48+5:30
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील एस. जे. शुगर अँड पॉवर लिमिटेड डिस्टीलरीसाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी अग्निप्रदीपन व जलपूजन करून करण्यात आला.

रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
कुकाणे: रावळगाव साखर कारखान्या ला ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांनाा तात्काळ एस एम एस द्वारे उसाचे वजन कळविण्यात येईल, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक जयंत पाटील यांनी केले. मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील एस. जे. शुगर अँड पॉवर लिमिटेड डिस्टीलरीसाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी अग्निप्रदीपन व जलपूजन करून करण्यात आला. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. साखर कारखान्याच्या विस्तीर्ण मोकळ्या जागेत पाणी साठवण्यासाठी मोठा तलाव बांधण्यात आला आहे. त्याचेही पूजन करण्यात आले. साखर कारखान्याच्या संचालिका मीरा घाडीगांवकर, स्मिता इघे व तज्ज्ञ सल्लागार राहुल इघे यांच्याहस्ते पूजा , बॉयलर प्रदीपन अग्नी प्रजवलीत करून करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, शेखर पवार, कुंदन चव्हाण, अधिकारी व कमर्चारी उपस्थित होते.
--------------
मालेगाव तालुक्यात रावळगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी पूजा करताना संचालक स्मिता इघे व राहुल इघे. (२१ मालेगाव २)