कॉँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:21 IST2019-01-23T17:21:01+5:302019-01-23T17:21:16+5:30
सटाणा : युवाशक्ती व किसान कार्डची नोंदणी

कॉँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानचा शुभारंभ
सटाणा : बागलाण तालुक्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘चलो पंचायत’ अभियानाचा शुभारंभ शहरातील अचानकनगर मधून करण्यात आला.
यावेळी ‘चलो पंचायत’अभियानासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव मिलिंद चित्ते यांनी सविस्तर माहिती दिली. नाशिक जिल्हा कॉग्रेसचे प्रवक्ते सचिन कोठावदे,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी मार्गदर्शन केले. केदा पवार यांनी वस्तीवरील विविध समस्या व अडचणी संदर्भात विविध समस्या मांडल्या. चलो पंचायत अभियानाअंतर्गत युवाशक्ती व किसान कार्ड यांची नोंदणी करण्यात आली. बागलाण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अरु ण नंदन यांनी प्रास्ताविक केले. युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र धिवरे, देवठाणचे सरपंच चुनीलाल ठाकरे, तुंगणचे उपसरपंच वामन गावित, बागलाण विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण पवार, प्रवीण सोनवणे, भारत सोनवणे,गोपाल चव्हाण, रजिवान सय्यद,बबलू पठाण, फिरोज शाह,निखिल कासारे, राजू गावित,भारत सोनवणे, देविदास पवार,गोरख बागुल, विवेक ढोमणे, तुषार मोरे, बापू वाघ,केदा आहीरे,किशोर माळी, बंडू मोरे,रावण पवार,राहुल ठाकरे,संजय सोनवणे,दीपक पवार,बाळू पवार,कांतीलाल सूर्यवंशी,प्रवीण सूर्यवंशी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.