विश्रामगडावर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 06:15 PM2019-04-25T18:15:13+5:302019-04-25T18:15:33+5:30

नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरद्दीवर असणाऱ्या तालुक्यालगतच्या विश्रामगडावर निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता मोहिम राबविली.

Launch of cleanliness drive at Lata Gada | विश्रामगडावर स्वच्छता मोहीम

विश्रामगडावर खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता मोहिम राबविली. त्याप्रसंगी रवींद्र गोर्डे, रामदास भोर, योगिता गोर्डे, रहिम शेख, शालिनी गिते आदींसह विद्यार्थी.

Next

ठाणगाव : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरद्दीवर असणाऱ्या तालुक्यालगतच्या विश्रामगडावर निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता मोहिम राबविली.
विश्रामगडाचा इतिहास जाणून घेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत परिसर स्वच्छ केला. गडाच्या पायथ्याशी असणाºया तोफेपासून या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेस सुरूवात केली. पश्चिमेकडील दिल्ली दरवाजाच्या पायथ्याशी असणाºया महादेव मंदिर परिसरात स्वच्छता केली. त्यांनतर गडावरील लक्ष्मणगिरी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात स्वच्छता करून गडदेवता अंबा-निंबा व पट्टाईदेवीचा परिसर स्वच्छ करून पूजन करण्यात आले. गडावरील अंबरखान्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी योगिता गोर्डे, रहिम शेख, शालिनी गिते, गायत्री घुमरे, प्राची गिते, नवनाथ माळी, प्रथमेश घुमरे आदींसह विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: Launch of cleanliness drive at Lata Gada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.