देवळा तालुक्यात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 19:03 IST2018-09-16T19:02:44+5:302018-09-16T19:03:06+5:30

देवळा तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ पंचायत समिती सभागृहात सभापती केशरताई अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला .

 Launch of Cleanliness campaign in Deola taluka | देवळा तालुक्यात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

देवळा तालुक्यात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य शांताबाई पवार, गटविकास अधिकारी महेश पाटील, नायब तहसीलदार गिरीश वाखारे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुष्पहार करण्यात आले .यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावाचे नेमणूक करण्यात आलेले संपर्क अधिकारी, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी पंचायत समिती सभागृह आवाराची स्वच्छता केली . या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती स्तरावरील सर्व विभाग प्रमुख ,कक्ष अधिकारी ,आरोग्य ,शिक्षण ,पशुसंवर्धन ,कृषी ,महिला व बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, ग्रामपंचायत विभाग, रोजगार हमी ,बचत गट , घरकुल विभाग यांच्यासह सर्वच ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन विस्तार अधिकारी भैय्यासाहेब सावंत यांनी केले.

Web Title:  Launch of Cleanliness campaign in Deola taluka