आपत्ती निवारण सप्ताहानिमित्त जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:27 IST2018-10-13T01:26:44+5:302018-10-13T01:27:03+5:30

आपत्ती निवारण सप्ताहनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनजागृती चित्ररथ आणि रॅलीचा शुभारंभ महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.

Launch of awareness program for disaster relief week | आपत्ती निवारण सप्ताहानिमित्त जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ

आपत्ती निवारण सप्ताहानिमित्त जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ

नाशिक : आपत्ती निवारण सप्ताहनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनजागृती चित्ररथ आणि रॅलीचा शुभारंभ महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी निवासी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे आदी उपस्थित होते. यावेळी कॅन्टोनमेंट बोर्ड हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पूर परिस्थितीतील आपत्ती व्यवस्थापनाबाबत पथनाट्य सादर केले. शहरातील एमजी रोड, शालिमार, जि.प. मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.

Web Title: Launch of awareness program for disaster relief week