दिंडोरीत अत्याधुनिक घंटागाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 18:37 IST2020-02-20T18:37:03+5:302020-02-20T18:37:34+5:30
दिंडोरी नगरपंचायतीच्या सेवेत भारत सरकारच्या स्वच्छ भारत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आधुनिक चार घंटागाड्या दाखल झाल्या आहे. नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या हस्ते घंटागाड्यांचे पूजन करण्यात आले.

दिंडोरी नगरपालिकेत अत्याधुनिक घंटागाड्यांच्या लोकार्पणप्रसंगी नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह नगरसेवक.
दिंडोरी : नगरपंचायतीच्या सेवेत भारत सरकारच्या स्वच्छ भारत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आधुनिक चार घंटागाड्या दाखल झाल्या आहे. नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या हस्ते घंटागाड्यांचे पूजन करण्यात आले.
या चारही घंटागाड्या अत्याधुनिक आहे. या गाड्यांमध्ये रिमोट कंट्रोल, हायड्रोक्लोरिक सिस्टिम, एअर कंडिशन, ओला-सुका व घातक कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट युक्त व जास्त क्षमता असलेल्या आहे. यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन जलद होण्यास मदत होणार आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, प्रमोद देशमुख, रोहिणी पगारे, सविता देशमुख, आशा कराटे, शैलाताई उफाडे, रत्नाबाई बोरस्ते, विमल जाधव, तुषार वाघमारे, मालती जाधव, सचिन देशमुख, निर्मला जाधव, धनराज भवर, संतोष गांगुर्डे, रंजना चारोस्कर, माधवराव साळुंके, नीलेश गायकवाड आदींसह नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.