उन्हाळ कांद्याची लागवड उशिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 19:06 IST2019-12-15T19:05:45+5:302019-12-15T19:06:04+5:30
दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी उशिरा कांद्याची लागवड केली जात आहे.

उन्हाळ कांद्याची लागवड उशिरा
खामखेडा : दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी उशिरा कांद्याची लागवड केली जात आहे.
दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. उन्हाळ कांदा लागवडीसाठी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली जाते. ती नोव्हेंबर ते साधारण १५ डिसेंबर पर्यंत केली जाते. आता सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीचा मोसम असल्याने मजूर मिळत नाही. तेव्हा शेतकऱ्याला मजुरासाठी वणवण करीत भटकावे लागत आहे. तेव्हा बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे.
कांद्याची रोपे खराब
मध्यंतरी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकºयाला दोन वेळेस कांद्याची बियाणे टाकून रोपे तयार करावी लागल्याने यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवड उशिरा होत आहे. यामुळे आता सर्वत्र एकाच वेळेस कांदे लागवडीस सुरुवात झाल्याने आता शिवारात सर्वत्र कांदा लागवड दिसून येत आहे. पूर्वी बागायती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतकामासाठी अगदी सहज मजूर उपलब्ध होत असे, परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजूर उपलब्ध होत नाही.