..अखेर चाके फिरली
By Admin | Updated: January 23, 2016 22:39 IST2016-01-23T22:38:12+5:302016-01-23T22:39:19+5:30
वसाका : ८०० टन उसाचे गाळप

..अखेर चाके फिरली
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाला सुरुवात झाली असून, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८०० टन उसाचे गाळप झाल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाचा सोमवारी (दि.१८) शुभारंभ करण्यात आला. गेले दोन ते तीन दिवस तांत्रिक अडचणी दूर करत कामगारांनी अखेर गाळपास प्रारंभ केला. गेल्या तीन वर्षापासून बंद असलेली मशनरी सुस्थितीत चालल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्षेत्रातील व उत्पादक सभासदांचा ऊस इतर कारखान्यांमध्ये जात होता. परंतु वसाका सुरू झाल्याने अनेक ऊस उत्पादकांनी आपला ऊस या कारखान्याला दिला आहे. या पुढील काळातही उत्पादकांनी आपला ऊस वसाकाला द्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)