शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

जिल्ह्यात अंतिम चरणात प्रचार सभांचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:24 AM

विधानसभा निवडणुकीत अंतिम चरणात आता खºया अर्थाने प्रचाराचा धुरळा उठू लागला असला तरी, काही मतदारसंघात स्टार प्रचारकांनी पायधूळ न झाडल्याने तेथील उमेदवारांना स्थानिक स्तरावरच प्रचारयंत्रणेवर भर देणे भाग पडले आहे. स्टार प्रचारकांच्या सभांसाठी लागणारा खर्च, त्याच्या तयारीत जाणारा वेळ, कार्यकर्त्यांचे लागणारे बळ आणि गर्दी जमविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा पाहता यंदा राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांनी स्वत:हूनच स्टार प्रचारकांवर फुली मारल्याचेही दिसून आले आहे.

ठळक मुद्देस्टार प्रचारकांची काही मतदारसंघांकडे पाठ : जाहीर सभांपेक्षा प्रचार फेऱ्यांवरच अधिक भर

नाशिक : विधानसभा निवडणुकीत अंतिम चरणात आता खºया अर्थाने प्रचाराचा धुरळा उठू लागला असला तरी, काही मतदारसंघात स्टार प्रचारकांनी पायधूळ न झाडल्याने तेथील उमेदवारांना स्थानिक स्तरावरच प्रचारयंत्रणेवर भर देणे भाग पडले आहे. स्टार प्रचारकांच्या सभांसाठी लागणारा खर्च, त्याच्या तयारीत जाणारा वेळ, कार्यकर्त्यांचे लागणारे बळ आणि गर्दी जमविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा पाहता यंदा राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांनी स्वत:हूनच स्टार प्रचारकांवर फुली मारल्याचेही दिसून आले आहे.विधानसभा निवडणुकीची मैफल आता समेवर येऊन ठेपली आहे. अवघ्या चार दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांची मतदारसंघ पिंजून काढताना दमछाक होताना दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेनंतर गेल्या नऊ दिवसात जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवारांनी आपापल्या कुवतीनुसार शक्तिप्रदर्शन दाखविले आहे. नाशिक शहरातील नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि देवळाली या चारही मतदारसंघात चुरस निर्माणझाली आहे. विशेषत: नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भाजपचे राष्टÑीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचेच कार्यकर्ता संमेलन झाले आहे तर नाशिक पश्चिममध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झालेली आहे. देवळाली शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो; परंतु याठिकाणी सेनेच्या एकाही स्टार प्रचारकाची जाहीर सभा झालेली नाही.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या सुरुवातीला सटाणा आणि चांदवड या दोन मतदारसंघांत सभा घेतल्या तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिंडोरी मतदारसंघातील वणी, नांदगाव मतदारसंघातील मनमाड आणि येवला येथे जाहीर सभा घेतल्या. राष्टÑवादीचे सध्या फार्मात असलेले अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्ह्यात कळवण, सिन्नर, नाशिक शहर, देवळाली, दिंडोरी, येवला या ठिकाणी प्रचार फेºया काढल्या तर राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सिन्नर, दिंडोरी येथे सभा झाल्या. छगन भुजबळ यांनीही जिल्ह्यात सभा घेतल्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची बुधवारी (दि. १६) नाशिकला डोंगरे वसतिगृह मैदानावर तोफ धडाडली. काँग्रेसचा एकही स्टार प्रचारक नाशिक जिल्ह्यात फिरकला नाही. मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे असुदुद्दीन ओवेसी यांची एकमात्र सभा झाली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नांदगाव मतदारसंघातील मनमाड येथे सभा झाली तर नाशिकची नियोजित सभा रद्द झाली. जिल्ह्यात माकपचे दोन ठिकाणी उमेदवार लढत देत आहेत; परंतु नाशिक पश्चिममध्ये पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्य आणि माजी खासदार सुभाषिनी अली यांची एकमेव सभा होऊ शकली.इगतपुरी, देवळालीकडे सेना नेत्यांची पाठजिल्ह्यातील निफाड, कळवण, इगतपुरी, मालेगाव बाह्य तसेच देवळाली या मतदारसंघात कोणत्याही राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकाने अद्याप हजेरी लावलेली नाही. विद्यमान आमदाराच्या पक्षांतरामुळे चर्चेत आलेल्या इगतपुरी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रसंगी झालेली सभावगळता शिवसेनेकडून एकाही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही. त्यामुळे तेथील सेनेच्या जागेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचप्रमाणे सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाºया देवळालीकडेही राज्यस्तरीय शिवसेना नेत्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रचार संपायला आता अवघे तीन दिवस उरले असून या अखेरच्या चरणात प्रचाराचा धुराळा आणखी उठण्याची शक्यता आहे. काही सभा नियोजित आहेत. मात्र, यंदा जाहीर सभांऐवजी उमेदवारांनी घरोघरी प्रचारयंत्रणा राबविण्यावरच अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.युतीच्या तुलनेत आघाडीत एकोपाविधानसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती झाली असली तरी, भाजपने शिवसेनेच्या आणि शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठीच सभा घेतल्या. त्यातही नाशिक पश्चिममध्ये युतीत शिवसेनेने उघडपणे असहकार पुकारलेला आहे. अन्यत्रही अपवादानेच परस्परांसाठी मते मागितली जात आहेत. युतीच्या तुलनेत कॉँग्रेस आघाडीत मात्र एकोप्याचे दर्शन घडताना दिसत आहे. सभांचे व्यासपीठ असो की पदयात्रा, दोन्ही पक्षाचे नेते-कार्यकर्ते त्यात सोबतीने दिसत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण