लासलगावी आॅडिटरनेच केला रक्कम लुटल्याचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:08 IST2019-06-18T18:08:03+5:302019-06-18T18:08:33+5:30
सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचा आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक यानी कर्ज वसुलीची रक्कम बॅँकेत भरणा करण्यास जात असताना दोन अनोळखी इसमांनी बॅगेतून १ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम लुटल्याचा केलेला बनाव सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी उघडे करीत फिर्यादीलाच अटक करून अवघ्या काही तासांत या रकमेपैकी एक लाख दहा हजार रु पये मुद्देमाल जप्त केला आहे.

लासलगाव येथील सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचा आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक याच्या समवेत सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे. पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस कर्मचारी कैलास महाजन, प्रदीप आजगे, योगेश शिंदे आदी.
लासलगाव : सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचा आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक यानी कर्ज वसुलीची रक्कम बॅँकेत भरणा करण्यास जात असताना दोन अनोळखी इसमांनी बॅगेतून १ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम लुटल्याचा केलेला बनाव सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी उघडे करीत फिर्यादीलाच अटक करून अवघ्या काही तासांत या रकमेपैकी एक लाख दहा हजार रु पये मुद्देमाल जप्त केला आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचे आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक (रा. गौळाणे रोड, पाथर्र्डी फाटा, नाशिक यानी लासलगाव पोलीस कार्यालयात सोमवारी (दि.१७) दुपारी तीन वाजता लासलगावच्या एचडीएफसी बॅँकेच्या फायनान्स खात्यात कर्ज वसुलीची रक्कम ३,६६,५१० ही बॅँकेत भरणा करण्यास जात असताना काळ्या रंगाच्या पल्सरवरून तोंडाला रु माल बांधून दोन अनोळखी इसमांनी लासलगावच्या दत्त मंदिरासमोर यामाहा एफझेड मोटारसायकलवरून (क्र. एमएच जीई ८२३७) घेऊन जात असता बॅगेतून एक लाख शहाण्णव हजारांची रक्कम लुटल्याची फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी फिर्यादीची चौकशी केली असता हा सर्व प्रकार संशयास्पद दिसून आला. चौकशीनंंतर हा फिर्यादीच चोर निघाला. त्यानंतर सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचा आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक (रा. गौळाणे रोड, पाथर्डी फाटा नाशिक) यास अटक केली.