लासलगावी कांदा भावात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:49 IST2019-10-30T12:49:15+5:302019-10-30T12:49:22+5:30

लासलगांव : येथील बाजार समितीत दिपावली सणांच्या सुट्टीनंतर आज बुधवारी दि. ३० आॅक्टोबर रोजी कांदा आवक कमी झाल्याने भावात १५० रूपयांची तेजी आली.

 Lasalgavi onion prices boom | लासलगावी कांदा भावात तेजी

लासलगावी कांदा भावात तेजी

लासलगांव : येथील बाजार समितीत दिपावली सणांच्या सुट्टीनंतर आज बुधवारी दि. ३० आॅक्टोबर रोजी कांदा आवक कमी झाल्याने भावात १५० रूपयांची तेजी आली. ४६ वाहनातील ५०७ क्विंटल कांदा किमान १३०१ ते कमाल ४०५२ व सरासरी ३७०० रूपये क्विंटल भावाने सकाळी सत्रात विक्र ी झाला. दिनांक २३ रोजी कांदा आवक २९६९ क्विंटल २९० नग वाहनातुन झाली. प्रति क्विंटल उन्हाळ कांदा किमान १२०० ते ३७६१ रूपये सर्वात जास्त तर सरासरी ३५०० रूपये दीपावली सणानिमित्त लासलगाव कांदा मार्केट शुक्र वार दिनांक २५ ते दिनांक २९ आॅक्टोबरपर्यंत बंद होते. बुधवार दिनांक ३० आॅक्टोबरपासून लिलाव पुर्ववत सुरू झाले.

Web Title:  Lasalgavi onion prices boom

टॅग्स :Nashikनाशिक