लासलगावी कांद्याला ७५९९ रूपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 14:16 IST2019-11-25T14:16:13+5:302019-11-25T14:16:21+5:30
लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळसत्रात उन्हाळ कांद्याची आवक कमालीची घटली असुन लाल कांदा आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहात अजून कांदा आवक वाढेल असे लासलगाव कृषी उत्पन्न सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.

लासलगावी कांद्याला ७५९९ रूपये भाव
लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळसत्रात उन्हाळ कांद्याची आवक कमालीची घटली असुन लाल कांदा आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहात अजून कांदा आवक वाढेल असे लासलगाव कृषी उत्पन्न सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.
सोमवार दि.२५ नोव्हेंबर रोजी १५ वाहनातील १२० क्विंटल उन्हाळ कांदा २३०० ते ७५९९ रूपये सर्वाधिक व सरासरी ७०१२ रूपये भावाने तर १६६ वाहनातील १३१० क्विंटल लाल कांदा १८०१ ते ६०२६ रूपये सर्वाधिक व ५४०१ रूपये सरासरी भावाने विक्र ी झाला. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ४८०४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये २००० रूपये कमाल रु पये ७,९५० तर सर्वसाधारण रु पये ६,०४१ तर लाल कांद्याची ३,४२९ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये १,६०१ रूपये कमाल रु पये ६,१७५ तर सर्वसाधारण रु पये ४,८०० रूपये प्रती क्विंटल राहिले.