लासलगांव : कृषि औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 19:04 IST2018-12-23T19:03:01+5:302018-12-23T19:04:31+5:30
लासलगांव : कांद्याच्या प्रश्नावर कायम स्वरूपी मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. जगभरातील देश कांदा प्रक्रि या उद्योग राबवीत आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असूनही जिल्ह्यात कांद्यावर प्रक्रि या करून विविध प्रकारचे उत्पादन करणारा एकही उद्योग नाही. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या कल्याणासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून प्रक्रि या उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि उत्पन्न बाजार समतिी लासलगांव येथे आयोजित प.पू. भगरीबाबा भव्य कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन २०१८ च्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आ. अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, बाजार समतिीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, बाजार समिती सदस्य अशोक गवळी, मोतीराम मोगल, संपपराव डुमरे, अजीत सानप, उत्तम शिंदे, नथुजी नागरे, चांगदेव होळकर, मानसिंग गायकवाड, रवींद्र पगार, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे माजी बाजार समिती सदस्य हरीश्चंद्र भवर मुकुंद होळकर, कैलास सोनवणे, निसाकाचे अध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते पंचायत समिती उपसभापती गुरु देव कांदे, गुणवंत होळकर, गोकुळ पाटील, अनिल सोनवणे, बाजार समिती सचिव बी. वाय. होळकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे, प्रशांत राका, प्रा. सुभाष आवटी आदिंचा सत्कार करण्यात आला.
राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५० कोटी रु पयांची मदत जाहीर केली असून दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कमी दराने विक्र ी झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रु पये अनुदान घोषित केले आहे. सरकारची ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांवर पक्षभेद विसरून सर्व राजकीय पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
यावेळी अनिल कदम म्हणाले की, शेतकºयांना अभिप्रेत असलेले काम करत आहोत. नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी शेतकºयांना कृषी प्रदर्शन फायद्याचे ठरेल त्यामुळे शेतकºयांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. शेतीला जोडव्यवसाय केल्याशिवाय शेतकºयांना फायदा होत नाही. सातत्याने शेतकर्यांच्या विषयी तळमळ असल्याने छगन भुजबळ त्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्र मक असतात ते सोडविण्यासाठी त्याचे सातत्याने प्रयत्न करत असताना असे त्यांनी सांगितले.
यावेळी जयदत्त होळकर म्हणाले की, शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकºयाचा सन्मान करावा या उद्देशाने कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हार्दिक जोशी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. किशोर गोसावी, सुनील डचके यांनी केले. (फोटो २३ लासलगाव, २३ लासलगाव १)