शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

लासलगावी कांदा दरात उसळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:58 PM

लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव सोमवारी (दि. २२) चार हजार रुपयांच्या वर गेल्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याची बंपर आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होणार असल्याने ग्राहकांना तोपर्यंत चढ्या भावानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.

ठळक मुद्देचार हजार पार : उन्हाळ कांद्याची लवकरच आवक

लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव सोमवारी (दि. २२) चार हजार रुपयांच्या वर गेल्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याची बंपर आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होणार असल्याने ग्राहकांना तोपर्यंत चढ्या भावानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे लेट खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे लाल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीसाठी येत असताना ५० टक्‍क्‍यांनी घटल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे बाजार समितीत कांद्याचे सर्वसाधारण बाजारभाव चार हजार रुपयांच्या वर गेले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ८ लाख ४० हजार ५५५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला कमीत कमी ८०० रुपये , जास्तीत जास्त २८४७ रुपये तर सर्वसाधारण १९३९ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला होता.

यंदा मात्र कांद्याला चांगला बाजारभाव असला तरी गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका लेट खरीप कांद्याला बसल्यामुळे कांद्याचे रोप वाया गेले होते. त्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. याचा परिणाम होत लेट खरीप लाल कांद्याची आवक घटली. आता २२ फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ७ हजार ९३८ क्विंटल कांद्याची आवक होऊन कमीत कमी ८००, जास्तीत जास्त ४५०० तर सर्वसाधारण ३५१६ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्यानंतर वाढलेले कांद्याचे बाजारभाव स्थिर होत ग्राहकांना दिलासा मिळेल, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.कांद्याच्या बाजारभावात आज जरी वाढ दिसत असली तरी केंद्र सरकारने कुठलेही निर्णय घेत कांद्यावर निर्बंध लादू नयेत. गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे तसेच गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीही अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी उन्हाळ कांद्याला फटका बसल्याने कांद्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे आज जरी कांद्याचे बाजारभाव वाढलेले दिसत असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यातून काही फायदा होणार नाही.- भारत दिघोळे, कांदा उत्पादक शेतकरीका वाढले कांद्याचे भाव?१) मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पर्यटनाला मिळालेली चालना.२) हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये कांद्याच्या मागणीत झालेली वाढ.३) निर्यात खुली असल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा देशांतर्गत पुरवठा घटला. 

टॅग्स :onionकांदाMarketबाजार