लासलगावी कांदा दरात आठशे रुपयांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:00 IST2020-01-10T23:59:33+5:302020-01-11T01:00:04+5:30
लासलगाव : लासलगाव बाजार समितीत गुरुवारच्या तुलनेत शुक्र वारी आठशे रुपयांची घसरण झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत दरामध्ये २२०० रुपयांची ...

लासलगावी कांदा दरात आठशे रुपयांची घसरण
लासलगाव : लासलगाव बाजार समितीत गुरुवारच्या तुलनेत शुक्र वारी आठशे रुपयांची घसरण झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत दरामध्ये २२०० रुपयांची घसरण या सप्ताहात शेवटच्या दिवशी झाली. यामुळे कांदा उत्पादकांची नाराजी वाढली आहे. शुक्र वारी १९६३ वाहनांतील २१,३३८ क्विंटल लाल कांद्याला किमान १००० ते कमाल ३५४०, तर सरासरी २७०० रुपये दर जाहीर झाला. कांदा दर घसरल्याने कांदा निर्यातबंदी त्वरित उठवावी व कांदा साठवणुकीवरील निर्बंध रद्द करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.