लासलगावी कांद्याला २१५२ रूपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 15:32 IST2021-06-01T15:32:20+5:302021-06-01T15:32:31+5:30

लासलगांव : येथील बाजार समितीत मंगळवारी कांद्याला २१५२ रूपये भाव मिळाला.

Lasalgaon onion price Rs. 2152 | लासलगावी कांद्याला २१५२ रूपये भाव

लासलगावी कांद्याला २१५२ रूपये भाव

लासलगांव : येथील बाजार समितीत मंगळवारी कांद्याला २१५२ रूपये भाव मिळाला. दिवसभरात २५,९०० क्विंटल उन्हाळ कांदयाचा लिलाव ६०० ते २१५२ व सरासरी १८०० रूपये भावाने झाला. काल दिवसभरात ३५,७५० क्विंटल उन्हाळ कांदयाचा लिलाव ७०० ते २२०० व सरासरी १८५० रूपये भावाने झाला.  गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १,१६,२०५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६०० कमाल रुपये २,०२१ तर सर्वसाधारण रुपये १,५७६ प्रती क्विंटल राहिले. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा  येथील उपबाजार आवारात सोमवारी कांद्याला २४०० रुपये भाव मिळाला. बाजार समितीच्या आवारात ५९८ ट्रॅक्टर्समधून अंदाजे १२५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन कमाल २४०० रुपये,किमान ३०० रुपये तर सरासरी १८०० ते १९०० रुपये दराने खरेदी-विक्री व्यवहार पार पडले.

Web Title: Lasalgaon onion price Rs. 2152

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक