लासलगावी सात महिन्यांनंतर आठवडे बाजार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:02 IST2020-10-25T22:45:10+5:302020-10-26T01:02:39+5:30
लासलगाव : तब्बल सात महिन्यांनंतर रविवारी प्रथमच लासलगाव येथे कोरोना महामारीमुळे बंद असलेला आठवड बाजार पूर्ववत सुरू झाला. मात्र गर्दी फारच कमी होती.

लासलगावी सात महिन्यांनंतर आठवडे बाजार सुरू
ठळक मुद्देदुपारी फुलांची टंचाईची परिस्थिती
लासलगाव : तब्बल सात महिन्यांनंतर रविवारी प्रथमच लासलगाव येथे कोरोना महामारीमुळे बंद असलेला आठवड बाजार पूर्ववत सुरू झाला. मात्र गर्दी फारच कमी होती.
दसरा सण असल्याने नागरिकांनी आठवडे बाजारात न येणेच पंसद केले. रविवारी सकाळी दसरा सणाच्या निमित्ताने फूलबाजारात झेंडू फुले शंभर रूपये किलो दराने विक्री होत होती. परंतु दुपारी फुलांची टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे झेंडूचा दर दोनशे रुपये किलो दराने विक्री होत होती.