लासलगांव बाजार समितीत उन्हाळ कांदा ६१९५ तर लाल कांदा ४३१२ रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 00:21 IST2020-11-01T00:20:57+5:302020-11-01T00:21:20+5:30
लासलगांव : शनिवारी (दि.३१) लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत उन्हाळ बरोबरच लाल कांदाही विक्रीस आला असुन १६३ वाहनातील १७३० क्विंटल कांदा १०६० ते ६१९५ व सरासरी ५४०० रूपये दराने तर ९ वाहनातील ९० क्विंटल लाल कांदा १२८० ते ४३१२ व सरासरी ४२०१ रूपये भावाने विक्री झाला.

लासलगांव बाजार समितीत उन्हाळ कांदा ६१९५ तर लाल कांदा ४३१२ रूपये
ठळक मुद्देगत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ५,०२२ क्विंटल आवक
लासलगांव : शनिवारी (दि.३१) लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत उन्हाळ बरोबरच लाल कांदाही विक्रीस आला असुन १६३ वाहनातील १७३० क्विंटल कांदा १०६० ते ६१९५ व सरासरी ५४०० रूपये दराने तर ९ वाहनातील ९० क्विंटल लाल कांदा १२८० ते ४३१२ व सरासरी ४२०१ रूपये भावाने विक्री झाला.
गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ५,०२२ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये १,०११ कमाल रुपये ६,१९५ तर सर्वसाधारण रुपये ५,४५१ लाल कांद्याची ९० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये १,२८० कमाल रुपये ३,३१२ तर सर्वसाधारण रुपये ४,२०१ प्रती क्विंटल राहीले.