लासलगावी मजूर बसने मध्य प्रदेशला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:30 IST2020-05-23T21:07:35+5:302020-05-24T00:30:11+5:30
लासलगाव : गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथून मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी १९ मजूर पायीच रस्त्याने निघाले होते. त्यांच्या सोबत लहान तीन ते चार मुलेदेखील होती.

लासलगावी मजूर बसने मध्य प्रदेशला रवाना
लासलगाव : गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथून मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी १९ मजूर पायीच रस्त्याने निघाले होते. त्यांच्या सोबत लहान तीन ते चार मुलेदेखील होती.
हे मजूर लासलगावी आल्यानंतर गावातील ओम चोथाणी, मयूर बोरा, मनोज ब्रह्मेचा व सूरज आब्बड या मित्रांनी मजुरांची जेवण्याची व्यवस्था केली. शासनस्तरावर प्रयत्न करत एसटी मिळेपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था केली. शनिवारी दुपारी १२ वाजता या सर्व मजुरांना बस उपलब्ध झाली. त्यांना मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना करण्यात आले. आपल्या गावी जायला मिळण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या चौघा मित्रांनी या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडविले.