काच फोडून  कारमधून लॅपटॉपची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:29 AM2018-09-23T00:29:10+5:302018-09-23T00:29:26+5:30

कारची काच फोडून कारमधील लॅपटॉप, दागिने, मोबाइल वा पैसे चोरून नेण्याच्या घटना शहरात सुरूच आहेत़ त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेलजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे.

 Laptop steal from the car by breaking a glass | काच फोडून  कारमधून लॅपटॉपची चोरी

काच फोडून  कारमधून लॅपटॉपची चोरी

Next

नाशिक : कारची काच फोडून कारमधील लॅपटॉप, दागिने, मोबाइल वा पैसे चोरून नेण्याच्या घटना शहरात सुरूच आहेत़ त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेलजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे.  निफाड तालुक्यातील कोठुरे येथील रहिवासी मुकुंद मोगल हे मित्र चेतन अहेरसोबत बुधवारी (दि़१९) कामानिमित्त नाशिकला आले होते़ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली रेनॉल्ट कार (एमएच १५, ईबी ७५७६) त्र्यंबक रोडवरील महिंद्र शोरूमच्या बाजूला पार्क करून जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते़ जेवणानंतर ते कारजवळ आले असता त्यांना उजव्या दरवाजाची काच फोडलेली व त्यातील महागडा लॅपटॉप, बँक आॅफ महाराष्ट्राचे व एचडीएफसी बँकेचे एकूण चार चेकबुक चोरट्यांनी चोरून नेले होते़
महिलेस ठार मारण्याची धमकी
दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीतील रहिवासी शिल्पा संसारे यांच्या घराचा दरवाजा वाजवून दोन संशयितांनी शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि़२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संशयित आकाश दत्तू पवार व कुणाल वसंत म्हसदे (रा.वज्रेश्वरी झोपडपट्टी, दिंडोरीरोड) या दोघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
ट्रकच्या बॅटऱ्या चोरी
अमृतधाम परिसरातील साईनगर सोसायटीतील रहिवासी शरद टेमगर यांच्याा घरासमोर पार्क केलेल्या मालट्रकच्या (एमएच १५ एफव्ही ७०८३) १६ हजार रुपये किमतीच्या बॅटºया शुक्रवारी (दि़७) संशयित अनिल मोतिलाल वर्मा (रा.मारुती वेफर्ससमोर, तपोवन) याने चोरून नेल्याची फिर्याद पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे़
लॅपटॉपसह, संगणकाची चोरी
शरणपूररोडवरील रवि चेंबरमध्ये असलेल्या बॉश सिक्युरिटी एजन्सीच्या आॅफिसमधून संशयित धारा तायडे व तिचा भाऊ मंगेश तायडे यांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी दहा हजार रुपयांचा लॅपटॉप व दहा हजार रुपयांचा संगणक चोरून नेल्याची फिर्याद प्रशांत काळे (जाणता राजा कॉलनी, पंचवटी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़
आॅनलाइन रोलेट खेळणाºया दोघांना अटक
मोबाइलवर अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून आॅनलाइन रोलेट जुगार खेळविणाºया दोघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ सादिक खान सैफखान पठाण (रा.पखालरोड) व परवेज जुबेर शेख (रा.नाईकवाडीपुरा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत़ फाळकेरोड परिसरात दोन युवक नागरिकांकडून आॅनलाइन जुगारावर पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि़२१) दुपारी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता पठाण व शेख हे मोबाइलवर अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून रोलेट जुगार खेळताना तसेच खेळविताना आढळून आले. या दोघांकडून १ हजार ५०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Laptop steal from the car by breaking a glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.