मेसनखेडे येथे रोहीत्राजवळील तारेच्या विजेच्या धक्काने लांडोर मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 16:04 IST2020-10-26T16:03:24+5:302020-10-26T16:04:53+5:30
चांदवड - चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथे गट क्र मांक २५५ /७ या मध्ये, शेतातील विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राच्या जवळील तारेचा धक्का बसून लांडोर मृत्यूमुखी पडले.

मेसनखेडे येथे रोहीत्राजवळील तारेच्या विजेच्या धक्काने लांडोर मृत्यूमुखी
चांदवड - चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथे गट क्र मांक २५५ /७ या मध्ये, शेतातील विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राच्या जवळील तारेचा धक्का बसून लांडोर मृत्यूमुखी पडले. सदर घटनेची माहिती मिळताच मेसनखेडे येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पगार यांनी तात्काळ चांदवड येथील वनविभागाची संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. निवृत्ती पगार, माधव पगार, तेजस पगार यांच्या वस्ती जवळील रोहीत्राजवळील विजेच्या तारेचा शॉक बसून लांडोर याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी येऊन वनविभागाचे कर्मचारी साहेबराव गांगुर्डे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. पुढील कार्यवाही साठी चांदवड येथे लांडोर हलवण्यात आले. त्यानंतर चांदवड येथे सदर लांडोराचे शवविच्छेदन डॉ.अहिरे यांनी केले. तसेच वनविभागाच्या हद्दीत दफनविधी करण्यात आला. वन परिमंडळ अधिकारी विलास तातपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस के खंदारे., वनकर्मचारी साहेबराव गांगुर्डे, वनमजूर अशोक शिंदे आदी उपस्थित होते.