ओझरच्या जनशांतिधामात मंदिरांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:06 AM2020-03-01T00:06:55+5:302020-03-01T00:09:10+5:30

ओझर टाउनशिप : ओझर येथील ‘जनशांतिधाम’ येथे देवीच्या साडेतीन शक्तिपीठ मंदिराचे भूमिपूजन तसेच बारा ज्योतिर्लिंग व चार धाम मंदिरांच्या पायाभरणीचा शुभारंभ विविध आखाड्यातील साधू-संतांच्या हस्ते ब्रह्मवृदांच्या मंत्रघोषात पार पडला. या सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती होती.

Land worship of temples in the genocide of Ozar | ओझरच्या जनशांतिधामात मंदिरांचे भूमिपूजन

ओझरच्या जनशांतिधामात मंदिरांचे भूमिपूजन

Next
ठळक मुद्दे काही मंदिरांची पायाभरणी : हजारोंची उपस्थिती; संत-महंतांच्या दर्शनासाठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर टाउनशिप : ओझर येथील ‘जनशांतिधाम’ येथे देवीच्या साडेतीन शक्तिपीठ मंदिराचे भूमिपूजन तसेच बारा ज्योतिर्लिंग व चार धाम मंदिरांच्या पायाभरणीचा शुभारंभ विविध आखाड्यातील साधू-संतांच्या हस्ते ब्रह्मवृदांच्या मंत्रघोषात पार पडला. या सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती होती.
जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे पीठाधिश्वर शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ओझर येथे निर्माण करण्यात आलेले जनशांतिधाम जिल्ह्याचे वैभव ठरत आहे. या धामात एकूण ११७ शिवलिंगांची स्थापना करण्यात आली आहे. येथील ८१ फूट उंच असलेले हेमाडपंती बाणेश्वर महादेव मंदिर हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.
या जनशांतिधामात देवीच्या साडेतीन शक्तिपीठ मंदिराचे भूमिपूजन आणि चार धाम, बारा ज्योतिलर््िंाग मंदिरांच्या पायाभरणीचा शुभारंभ साधू-संतांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात पार पडला. प्रारंभी सोहळ्यास संतांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी सत्संग, प्रवचन, नामजप, संत-अतिथी-पालखीपूजन झाले. यावेळी हजारो महिलांना देवी स्वरूप मानून त्यांचे पूजन करण्यात आले. सोहळ्याचे पौरोहित्य विलास कुलकर्णी यांनी केले. गायक प्रा. राहुल शिंदे यांच्या विविध भक्तिगीतांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी साधू-संतांचा विशेष सन्मान करून संत भंडारा उत्साहात पार पडला. मंदिरासाठी श्रमदान करणाऱ्या नांदुर्डी येथील भाविकांचा सन्मान करण्यात आला.शांतिगिरी महाराजांचा सत्संग
शांतिगिरी महाराज यांनी सत्संगातून पतिव्रता धर्माचा महिमा विशद केला. भाविकांनी रोज पहाटे लवकर उठण्याची सवय लावावी आणि श्रममेव जयते यानुसार आश्रमात येऊन निष्काम भावनेने श्रमदान करावे. जपानुष्ठान करून आपल्या जीवनाला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन केले. आश्रमाचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी प्रास्ताविक केले. हजारो भाविकांनी धामातील देवतांच्या आणि बाबाजींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

Web Title: Land worship of temples in the genocide of Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.