येवलाऔद्योगिक वसाहत प्रवेशद्वाराचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 18:57 IST2019-08-11T18:57:08+5:302019-08-11T18:57:47+5:30
येवला येथील औद्योगिक सहकारी वसाहतीच्या प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे होते.

येवला औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार किशोर दराडे. समवेत भोलानाथ लोणारी, बंडू क्षीरसागर, अंबादास बनकर, दत्ता महाले, नवीनचंद्र परदेशी, अजय जैन, माणिकराव शिंदे, अनिल (लाला कुक्कर) आदी.
येवला : येथील औद्योगिक सहकारी वसाहतीच्या प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे होते. १९८३ साली स्थापन झालेल्या औद्योगिक वसाहतीच्या दर्शनी भागात सुमारे साडेपाच लाख
रुपये खर्चाचे प्रवेशद्वार निर्माण करण्याच्या समारंभाचा भूमिपूजन सोहळा शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते कोनशिलेचे उद्घाटन करून पार पडला.
वसाहती जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसखाते व महसूल यांचा समन्वय साधून बैठकीचे नियोजन करून वसाहतीच्या जागेचा प्रश्न मार्गी लावू, शिवाय औद्योगिक वसाहतीत मोठा उद्योग आणण्यासाठी बाहेरील उद्योगपतींना विनंती करू यासाठी मात्र संचालकांसह उद्योजक या सर्वांचा समन्वय व संमती गरजेचे असल्याचे आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.
वसाहतीच्या संचालक मंडळाच्या एकोप्याने विकास साधला जात आहे. वसाहतीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज असल्याची अपेक्षा माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास सुशील गुजराथी, संचालक अंबादास बनकर, भोलानाथ लोणारी, अजय जैन, जयश्री काळे, विक्रम गायकवाड, सुवर्णा चव्हाण, श्याम कंदलकर, अस्मिता गायकवाड, सतीश छतानी, सुकृत पाटील, मुकेश चवळे, नवीनचंद्र परदेशी, अमोल वाघ, पुरुषोत्तम काबरा, व्यवस्थापक सोपान पैठणकर, सहकार अधिकारी मंगेश उगलमुगले, विजय बोरसे, सुनील लक्कडकोट, भाऊ वडे, किरण भांडगे, त्र्यंबक वखारे, विजय कदम, अमोल वाघ, एकनाथ गायकवाड, डॉ. नरेश चनालिया, उद्योजक मयूर गुजराथी, राजू पवार, अरुण भावसार, दिनेश परदेशी, बाळू गायकवाड, अरविंद जोरी आदी उपस्थित होते.