कर्जदार शेतक-यांच्या जमिनीचा लिलाव पाडला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 16:39 IST2019-06-27T16:39:17+5:302019-06-27T16:39:45+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्लाबोल : जिल्हा बॅँकेचे पथक फिरले माघारी

The land of the borrower farmers' auction was demolished | कर्जदार शेतक-यांच्या जमिनीचा लिलाव पाडला बंद

कर्जदार शेतक-यांच्या जमिनीचा लिलाव पाडला बंद

ठळक मुद्देसकाळपासूनच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लासलगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत येऊन बसल्याने वसुली पथकाची अडचण झाली

लासलगाव : सरकारने दुष्काळी परिस्थितीत कुठलीही वसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले असताना देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लासलगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत हल्लाबोल करत बँकेने आयोजित केलेली जमिनीची लिलाव प्रक्रि या बंद पाडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की मरळगोई येथील शेतकरी सुखदेव फकिरा जगताप यांनी १९ लाख रु पये व पंढरीनाथ फकिरा जगताप यांनी १३ लाख रु पये कर्ज जिल्हा बॅँकेकडून घेतले होते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन नापिक झाल्याने कुठल्याही प्रकारचे शेतमालाचे उत्पादन शेतक-यांना घेता येत नाही. त्यातच थोड्याफार उत्पादित शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा स्थितीत शासनाने दुष्काळी स्थितीत कर्जाची वसुली न करण्याचे निर्देश बॅँकांना दिले आहेत. मात्र, गुरु वारी (दि.२७) जिल्हा बँकेचे वसुली पथक कर्जदार शेतक-यांच्या जमिनींचा लिलाव करण्यासाठी नाशिकवरून लासलगावी आले होते. या वेळी लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे देखील उपस्थित होते. मात्र सकाळपासूनच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लासलगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत येऊन बसल्याने वसुली पथकाची अडचण झाली. पदाधिकारी,शेतक-यांनी या वेळी अधिक-यांना घेराव घातला व लिलाव प्रक्रियेस कडाडून विरोध केला. या वेळी जिल्हा बँकेच्या अधिका-यांना जाब विचारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने पथकाला लिलाव प्रक्रि या थांबवावी लागली.
या वेळी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा निर्मला जगझाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले, साहेबराव मोरे, नाना बच्छाव, सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे, भाऊसाहेब तासकर, संजय पाटोळे, निवृत्ती गारे, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तू बोङके,नाशिक जिल्हा अध्यक्ष अनिल भझंगे, युवा जिल्हा प्रमुख जगन काकडे, शाम गोसावी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The land of the borrower farmers' auction was demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.