मजुराच्या घरातून २९ हजाराचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:52+5:302021-07-07T04:17:52+5:30
पेठ : शहरानजीक हट्टीपाडा परिसरातील खडी क्रेशरवर मजुरी करणाऱ्या मजुरांच्या घरातून सोने व रोख रक्कम असा २९ हजार रुपयाचा ...

मजुराच्या घरातून २९ हजाराचा ऐवज लंपास
पेठ : शहरानजीक हट्टीपाडा परिसरातील खडी क्रेशरवर मजुरी करणाऱ्या मजुरांच्या घरातून सोने व रोख रक्कम असा २९ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकी ता. पेठ येथील रहिवासी जनार्दन रावजी गावित हे पेठ शहरानजीक खडी क्रेशरवर मजुरी करतात. दि. ३० जून ते ४ जुलैदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून शोकेसमधून अंदाजे २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तसेच ९ हजार रोख रक्कम असा २९ हजाराचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद गावित यांनी ४ जुलै रोजी पेठ पोलिसात दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक ए. सी. गाडर तपास करीत आहेत.