निरगुडे येथे घरफोडीत ४६ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:26 IST2021-01-21T20:55:01+5:302021-01-22T00:26:31+5:30
पेठ : तालुक्यातील निरगुडे येथील एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख असा ४६ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

निरगुडे येथे घरफोडीत ४६ हजारांचा ऐवज लंपास
ठळक मुद्दे४६ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास
पेठ : तालुक्यातील निरगुडे येथील एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख असा ४६ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी हरिश्चंद्र तुकाराम गावंढे यांनी पेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४६ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून हवालदार भुसारे अधिक तपास करीत आहेत.