मालवाहतुकीसाठी लालपरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:54 IST2020-07-22T23:43:57+5:302020-07-23T00:54:32+5:30
सुरक्षित आणि वेळेवर ग्राहकांचा माल पोहोचवण्यासाठी लालपरी अर्थात एसटी बस सज्ज झाली असून, या सेवेचा व्यापारी, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी केले आहे.

महाराष्ट्र चेंबर्सच्या कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद. समवेत संतोष मंडलेचा, कैलास पाटील, श्रीनिवास चित्राव, प्रशांत जोशी, अमित अलई, सचिन शहा, स्वप्निल जैन, प्रशांत जोशी, चंद्रकांत दीक्षित, हेमांगी दांडेकर, अविनाश पाठक आदी.
सातपूर : सुरक्षित आणि वेळेवर ग्राहकांचा माल पोहोचवण्यासाठी लालपरी अर्थात एसटी बस सज्ज झाली असून, या सेवेचा व्यापारी, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी केले आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. कोरोनामुळे राज्यातील मालवाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शेतकरी, व्यापारी उद्योजकांचा तयार असलेला माल आणि लॉकडाऊननंतरचा तयार होत असलेला माल पाठवण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना करीत राज्य सरकारने मालवाहतूक करण्यासाठी महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाला मालवाहतूक करण्याची विशेष परवानगी दिली असल्याची माहिती विभागीय नियंत्रक मैंद यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले की, राज्य परिवहन महामंडळाच्या या सेवेमुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांची अडचण दूर झाली आहे. या सुविधेचा फायदा उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकरी यांना नक्कीच होईल, असेही मंडलेचा यांनी सांगितले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, श्रीनिवास चित्राव यांनीही संवाद
साधला. चेंबरचे कार्यकारिणी सदस्य प्रशांत जोशी, अमित अलई, सचिन शहा, स्वप्निल जैन, प्रशांत जोशी, चंद्रकांत दीक्षित, हेमांगी दांडेकर,अविनाश पाठक आदींसह सदस्य उपस्थित होते.