त्र्यंबक नगराध्यक्ष पदाचा कार्यभार ललित लोहगांवकर यांच्याकडे

By Admin | Updated: December 3, 2014 01:45 IST2014-12-03T01:44:16+5:302014-12-03T01:45:44+5:30

१२ डिसेंबरला नूतन नगराध्यक्षपदाची निवड

Lalit Lohgaonkar, Trimbakesh Nagaracharya, is in charge of the job | त्र्यंबक नगराध्यक्ष पदाचा कार्यभार ललित लोहगांवकर यांच्याकडे

त्र्यंबक नगराध्यक्ष पदाचा कार्यभार ललित लोहगांवकर यांच्याकडे

  त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेचा कार्यभार विद्यमान उपनगराध्यक्ष ललित लोहगांवकर यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्याधिकारी एन. एम. नागरे यांनी हा कार्यभार सोपविला. त्र्यंबक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष यशोदा सुनील अडसरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत न.पा. शाखेचे उपजिल्हाधिकारी निलेश पालवे यांच्याकडे सुपूर्द केला. सोमवारी जिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांनी राजीनामा स्वीकारला आणि आज नूतन नगराध्यक्षपदासाठी येत्या १२ डिसेंबरला नूतन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लावण्यात आला आहे. तोपर्यंतचा कार्यभार लोहगांवकर हे पाहणार आहेत. दरम्यान, ललित लोहगांवकर यांना आतापर्यंत तीनदा प्र. नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. कार्यभार स्वीकारताना नगरसेवक धनंजय तुंगार, मनोज थेटे, रवींद्र सोनवणे, राजेंद्र शिरसाट, पुरुषोत्तम कडलग, पुरुषोत्तम लोहगांवकर, गिरीश लोहगांवकर, प्रवीण लोहगावकर, डॉ. दिलीप जोशी, विश्वनाथ वाडेकर, बाबूराव उगले, छोटू पवार, भूषण अडसरे, प्रमोद कुलकर्णी, नगरसेवक रवींद्र गमे आदि उपस्थित होते.

Web Title: Lalit Lohgaonkar, Trimbakesh Nagaracharya, is in charge of the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.