शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

गंगापूररोडवर घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:07 IST

सहा लाखांची रोकड, सोळा लाखांचे मोबाइल यानंतरही पोलिसांनी धडा घेतलेला नसून गंगापूररोड परिसरातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे़ या घटनांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे़ त्यातच गंगापूररोड परिसरात आणखी दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून, सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

नाशिक : सहा लाखांची रोकड, सोळा लाखांचे मोबाइल यानंतरही पोलिसांनी धडा घेतलेला नसून गंगापूररोड परिसरातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे़ या घटनांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे़ त्यातच गंगापूररोड परिसरात आणखी दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून, सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़  गंगापूररोडवरील नवशा गणपतीनगरमध्ये असलेल्या आयुर्वेदन बंगल्यातील किचनच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ दीपक सुधाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत त्यांच्या बंद बंगल्याच्या किचनच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील ९़२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १२़६७ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे नेकलेस, १७.१९ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या चेन, ८़९३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, दोन हिऱ्याच्या अंगठ्या, मोत्याच्या दागिन्यांचा सेट व इतर दागिने असा १ लाख ९६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़लक्ष्मीनिवास सोसायटी, गंगापूररोडगंगापूररोडवरील जनलक्ष्मी बँकेच्या पाठीमागील लक्ष्मीनिवास सोसायटीतील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे पाऊण लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत चोरट्यांनी शांतिलाल तुळशीराम पवार (७७) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील सोन्याच्या बाळ्या, झुमके, अंगठी, टॉप्स, रामपान, चांदीच्या वस्तू, निरंजन, करंडा, लक्ष्मीमूर्ती, वाट्या, चांदीचे मेडल, जोडवे, पादुका, १४ हजार रुपयांची रोकड, लॉकरच्या चाव्या असा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस