लगीनसराई थंडावली; वाहतूकही मंदावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 01:06 AM2021-04-12T01:06:40+5:302021-04-12T01:07:23+5:30

एप्रिल, मे महिना म्हटला की, मोठ्या प्रमाणात लगीनसराईची घाई असते. साखरपुडा, लग्नाचा बस्ता बांधणे, सोने खरेदी असे अनेक कार्यक्रम सुरू असतात; पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लगीनसराई मात्र थंडावली असून, मोठी उलाढाल होणाऱ्या कापड बाजारपेठांंसह रस्ते, महामार्गही सुनसान झाल्यासारखे दिसत आहेत.

Laginsarai Thandavali; Traffic also slowed down! | लगीनसराई थंडावली; वाहतूकही मंदावली!

लगीनसराई थंडावली; वाहतूकही मंदावली!

Next

जळगाव नेऊर : एप्रिल, मे महिना म्हटला की, मोठ्या प्रमाणात लगीनसराईची घाई असते. साखरपुडा, लग्नाचा बस्ता बांधणे, सोने खरेदी असे अनेक कार्यक्रम सुरू असतात; पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लगीनसराई मात्र थंडावली असून, मोठी उलाढाल होणाऱ्या कापड बाजारपेठांंसह रस्ते, महामार्गही सुनसान झाल्यासारखे दिसत आहेत.
मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू झालेले कोरोनाचे  वादळ अजूनही थांबण्यास तयार नसल्याने मागील वर्षी अनेक विवाह सोहळे लाॅकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आले होते. पुढच्या वर्षी थाटामाटात लग्न करू अशा आशेवर असलेल्या वधू-वरांना मात्र  दुसरे वर्षही कोरोनाच्या सावटाखाली  चालल्याने  व मागील वर्षापेक्षा यावर्षी कोरोनाची  साखळी वाढत चालल्याने त्याचा परिणाम विवाह सोहळ्यांवर झाल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत.
तसेच मागील एक महिन्यापासून तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस  पार केल्याने कडाक्याच्या उन्हाळ्याने सर्वच सजीव त्राही त्राही होत आहेत तर सकाळी ८ वाजेपासून  सूर्य आग ओकत असल्याने ग्रामीण भागासह वर्दळीचे ठिकाणे सुनसान पडल्याचे दिसून येत आहे तर अतितापमान व कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे वाहतूकही कमी झालेली आहे.

Web Title: Laginsarai Thandavali; Traffic also slowed down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.