शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तरणतलावात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:41 AM

महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था, तुटलेले शॉवर, मोडकळीस जाळ्या यांसह अनेक समस्या सातपूर येथील तरणतलावमध्ये असून, या समस्या सोडविण्याबरोबरच प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पोहण्यासाठी येणाऱ्या महिला व नागरिकांनी केली आहे.

सातपूर : महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था, तुटलेले शॉवर, मोडकळीस जाळ्या यांसह अनेक समस्या सातपूर येथील तरणतलावमध्ये असून, या समस्या सोडविण्याबरोबरच प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पोहण्यासाठी येणाऱ्या महिला व नागरिकांनी केली आहे.सातपूर येथील क्लबहाउसमधील महापालिकेच्या तरणतलावात दररोज शेकडो आजीव महिला-पुरु ष सभासद स्विमिंगसाठी येतात. महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. तरीही साध्या प्राथमिक सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यात महिला व पुरु ष सभासदांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली आहे. तलाव परिसरातील जाळ्या तुटलेल्या आहेत. काही शॉवर तुटलेले आहेत, तर काही बंद पडलेले आहेत. परिसरात झाडी-झुडपी अस्ताव्यस्त वाढलेली आहेत. तलावाचे छप्पर (डोम)चे पत्रे तुटलेले आहेत. पत्रे अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असल्याने नियमित साफसफाई करण्यात यावी. डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी. फ्लोअरिंग उखडलेली आहे.तलाव परिसरातील रबरी मॅट बदलण्यात याव्यात आदी समस्या सोडविण्याबरोबर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शंकर पाटील, बजरंग शिंदे, भाऊलाल पाटील, एस. व्ही. जगताप, जी. बी. गायकवाड, पी. जी. शिरोडे, दिलीप भंदुरे, गणेश झनकर, गौतम खरे, बाळासाहेब पोरजे, पराग कुलकर्णी, दिलीप गिरासे, बाळासाहेब रायते, आबा महाजन, मनोज साळुंखे आदींसह सभासदांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.वेगळ्या तरणतलावाची गरजसातपूर येथील महापालिकेच्या तरणतलावाचे ५००च्या आसपास महिला व पुरु ष आजीव सभासद आहेत. ३००च्या जवळपास वार्षिक सभासद आहेत. समर कॅम्पमध्ये ५५० च्यावर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. दररोज येणारे पासधारक सभासद वेगळे. एवढी सभासद संख्या पाहता या ठिकाणी अजून एक तरणतलावाची आवश्यकता आहे. महिला सभासदांसाठी वेगळ्या तरणतलावाची गरज आहे. त्यातून महापालिकेला त्या प्रमाणात उत्पन्नही मिळेल, असेही सभासदांचे म्हणणे आहे.

टॅग्स :SwimmingपोहणेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका