गोदाघाट स्वच्छतेसाठी कामगार भरतीची मागणी

By admin | Published: October 30, 2015 10:48 PM2015-10-30T22:48:03+5:302015-10-30T22:49:08+5:30

गोदाघाट स्वच्छतेसाठी कामगार भरतीची मागणी

Labor recruitment demand for cleanliness in Godaghat | गोदाघाट स्वच्छतेसाठी कामगार भरतीची मागणी

गोदाघाट स्वच्छतेसाठी कामगार भरतीची मागणी

Next

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळानंतर गोदाघाटावरील रामकुंड ते टाळकुटेश्वर परिसरात पुन्हा एकदा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून याठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी कामगार भरतीची मागणी मेहतर, वाल्मिकी, दलित समाज युवा समितीने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, सिंहस्थ कुंभपर्वकाळात सफाईकामाचा ठेका दिल्याने गोदाघाट परिसराची स्वच्छता होत होती. या स्वच्छताकामी अनेक स्थानिक कामगार कार्यरत होते. आता ठेका संपल्यानंतर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून घाटावर कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी कामगार भरती करण्यात यावी आणि त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी समितीचे योगेश कल्याणी, राकेश चावरे, सुनील घलोत व ईश्वर घलोत यांनी केली आहे.

Web Title: Labor recruitment demand for cleanliness in Godaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.