लासलगावी महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:46 IST2019-02-07T17:46:44+5:302019-02-07T17:46:57+5:30
लासलगाव (प्रतिनिधी) :- एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी हळदी-कुंकू करावे म्हणून लासलगाव येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळ ग्रुपच्या वतीने माळी समाजातील महिलांना एक छताखाली एकत्रित करत हळदी-कुंकवाचा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती अनिता खैरे यांनी सांगितले.

लासलगावी महिलांचा सत्कार
लासलगाव (प्रतिनिधी) :- एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी हळदी-कुंकू करावे म्हणून लासलगाव येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळ ग्रुपच्या वतीने माळी समाजातील महिलांना एक छताखाली एकत्रित करत हळदी-कुंकवाचा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती अनिता खैरे यांनी सांगितले. यानिमित्त काही महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य, कलाकुसर तसेच वैचारिक देवाणघेवाण होते. माळी समाजातील महिलांना सावित्रीबाई फुले महिला मंडळ ग्रुपच्या वतीने या या कार्यक्र मात अनुभव आल्याचे महिलांनी सांगितले.महिलांना एकजूट करण्यासाठी डॉ संगीता सुरसे ,डॉ शरयू निकम ,धन्वंतरी जाधव ,आशा पवार ,यशश्री पवार ,योगिता खैरे,भारती पवार,कविता पवार,योगिता माळी, मंदा निकम ,स्नेहा पवार यांनी परिश्रम घेतले.