शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त महाराष्ट्रासाठी झाली होती कुसुमाग्रजांना अटक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:17 IST

संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० पूर्वी राज्यात ज्या नेतृत्वाने रान उठवले त्यात एस. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे सर्वज्ञात असले तरी आचार्य प्र. के. अत्रे, शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या तत्कालीन ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनीदेखील संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलनात योगदान दिले होते.  त्याचप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राचे  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनीदेखील त्या  काळी नाशिकला झालेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे त्यांना अटक झाली होती. 

ठळक मुद्देअसाही गर्जा जयजयकार  : कोर्ट उठेपर्यंत  न्यायालयातच बसून राहण्याची दिली होती शिक्षा

नाशिक : संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० पूर्वी राज्यात ज्या नेतृत्वाने रान उठवले त्यात एस. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे सर्वज्ञात असले तरी आचार्य प्र. के. अत्रे, शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या तत्कालीन ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनीदेखील संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलनात योगदान दिले होते.  त्याचप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राचे  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनीदेखील त्या  काळी नाशिकला झालेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे त्यांना अटक झाली होती. नाशिकमध्ये साठच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनासाठी मिरवणुका आणि शोभायात्रा सातत्याने निघत होत्या. कुसुमाग्रज हे जनभावनांच्या वास्तवाशी जोडलेले आणि जनसामान्यांमध्ये राहणारे कवी होते. त्यामुळे नाशकातही सातत्याने आंदोलने होऊ लागल्यावर त्यांनीदेखील एका आंदोलनाचे  नेतृत्व केले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी तात्यासाहेबांनी  सत्याग्रह केला ही त्या दिवशाची सर्वात मोठी घटना होती. पोलिसांनी त्यांना अटक करून कोर्टात उभे केले होते. कोर्टात उभे राहिल्यानंतर  तत्कालीन न्यायाधीशांनी त्यांना गुन्हा कबूल आहे का , असे विचारले.  त्यावेळी तात्यासाहेबांनी गुन्हा कबूल केला. तेव्हा कोर्टाने त्यांना कोर्ट उठेपर्यंत न्यायालयातच बसून राहण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात कोर्ट बरखास्त करण्यात आल्याने त्यांची शिक्षादेखील संपु्ष्टात आली होती. ६१ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या जुन्या स्मृतींना उजाळा मिळत आहे. दोघांचे हौतात्म्य संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत ज्या १०५ वीरांनी हौतात्म्य पत्करले. त्यात नाशिकचे गणपत श्रीधर जोशी आणि माधवराव राजाराम तुरे (बेलदार) यांचा समावेश आहे. रविवार कारंजा भागात उसळलेल्या दंगलीनंतर झालेल्या गोळीबारात ते दोघे गोळी लागून गतप्राण झाले होते. तसेच चित्रमंदिर चित्रपटगृह परिसरात बाळासाहेब शेंडगे यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांचा पाय कायमचाच अधू झाला होता. त्याशिवाय नाशिकच्या आंदोलनात तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते ॲड. दौलतराव घुमरे, रावसाहेब थोरात, ॲड. द. तु. जायभावे, इक्बाल हसरत, बी.डी. जाधव, शाहीर गजाभाऊ बेणी यांचादेखील समावेश होता.

टॅग्स :NashikनाशिकKusumagrajकुसुमाग्रजMaharashtraमहाराष्ट्र