जेष्ठ साहित्यिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान सन्मान जाहीर

By धनंजय रिसोडकर | Updated: January 28, 2023 19:48 IST2023-01-28T19:48:02+5:302023-01-28T19:48:40+5:30

स्त्रीकेंद्री जाणिवेच्या प्रभावी लेखिका अशी आशा बगे यांची ओळख आहे.

Kusumagraj Pratishthan's Janasthan honor announced to senior literary Asha Bage | जेष्ठ साहित्यिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान सन्मान जाहीर

जेष्ठ साहित्यिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान सन्मान जाहीर

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार आशा बगे यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशा बगे यांच्या भूमी या कादंबरीला 2006 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 

त्यांच्या 7 कादंबऱ्या आणि 12 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कालिदास कला मंदिरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी अर्थात 10 मार्च ला सायंकाळी सहा वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून कुसुमाग्रज प्रतिष्ठाचे अध्यक्ष न्या नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे.

स्त्रीकेंद्री जाणिवेच्या प्रभावी लेखिका अशी आशा बगे यांची ओळख आहे. परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालत त्यांनी सुमारे चार दशके कथा, कांदबरी, ललित असे चौफेर लेखन केले आहे. 

Web Title: Kusumagraj Pratishthan's Janasthan honor announced to senior literary Asha Bage