कृष्ण जन्मला गं सखे, कृष्ण जन्मला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:10 IST2020-08-12T21:28:00+5:302020-08-13T00:10:26+5:30

मालेगाव : दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा ‘कोरोना’च्या महामारीमुळे केवळ औपचारिकता म्हणून पूजा करुन साजरी करण्यात आली. यामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांचे मंदिरात न जाता बाहेरूनच कृष्णाचे दर्शन घ्यावे लागले.

Krishna was born, Sakhe, Krishna was born ... | कृष्ण जन्मला गं सखे, कृष्ण जन्मला...

मालेगाव कॅम्प सोमवार बाजारातील श्री कृष्ण मंदिर

ठळक मुद्देगोपाळकाला : भाविकांचे मंदीराबाहेरूनच दर्शन, मालेगावी भाविकांना महाप्रसादाचे वाटप, चांदवडला घरगुती पुजा

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा ‘कोरोना’च्या महामारीमुळे केवळ औपचारिकता म्हणून पूजा करुन साजरी करण्यात आली. यामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांचे मंदिरात न जाता बाहेरूनच कृष्णाचे दर्शन घ्यावे लागले.
शहरातील मालेगाव कॅम्प भागात स्मशानभूमी मारूती मंदिर भागात श्रीकृष्णाचे मंदिर आहे. तेथे श्यामबाबा मंदिर देखील आहे. दरवर्षी स्मशान मारूती भागातील श्रीकृष्ण मंदिरात भजनाचा कार्यक्रम होतो. दर्शनासाठी अबालवृद्ध गर्दी करीत असतात.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे केवळ भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मुन्नाबाबा, पिंटू अहिरे, पप्पू जगताप आदि पदाधिकारी विविध कार्यक्रम घेत असतात; मात्र यंदा निव्वळ औपचारिकता पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
मालेगाव कॅम्पातील गवळीवाडा भागात हनुमान व्यायाम शाळेजवळ श्री राधाकृष्ण मंदिर आहे. येथे दरवर्षी पूजा करुन विविध धार्मिक विधी पार पडत असतात. यंदा कोरोनामुळे केवळ पूजाविधी करण्यात आला. गवळी समाज बांधव राधाकृष्ण मंदिरात दरवर्षी मिरवणूक काढतात. कृष्णाचा ‘झोका’ असतो. भाविकांना प्रसाद म्हणून योजनाचा कार्यक्रम असतो.

Web Title: Krishna was born, Sakhe, Krishna was born ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.