मालेगावी कॉँग्रेसतर्फे क्रांतिज्योत फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:03 IST2018-08-10T21:01:35+5:302018-08-10T21:03:58+5:30
क्रांतिदिनानिमित्त मालेगाव शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने रात्री ९ वाजता किदवाई रस्त्यावरील पक्ष कार्यालयापासून क्रांतिज्योत फेरी काढण्यात आली.

मालेगावी कॉँग्रेसतर्फे क्रांतिज्योत फेरी
फेरीचा समारोप शहिदों की यादगार येथे झाला. यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष महापौर रशीद शेख, आमदार आसिफ शेख, प्रवक्ता साबीर गौहर उपस्थित होते. आमदार शेख यांनी सरकारवर टीका केली, ते म्हणाले, दि. ९ आॅगस्ट १९४२ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राष्ट्रीय कॉँग्रेसचे अधिवेशन झाले होते. यात महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘भारत छोडो’चा नारा देत एक चळवळ उभी केली होती. यावेळी सय्यद जमालुद्दीन, मौलाना अनिस अझहर, नबी अहमद शेख नुर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.