गंगाघाटावर कोयताधारी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 00:48 IST2021-07-17T00:44:30+5:302021-07-17T00:48:36+5:30

गंगाघाटावर धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या ताब्यातून कोयता जप्त करण्यात आला आहे.

Koyatadhari arrested at Gangaghata | गंगाघाटावर कोयताधारी जेरबंद

गंगाघाटावर कोयताधारी जेरबंद

नाशिक : गंगाघाटावर धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या ताब्यातून कोयता जप्त करण्यात आला आहे.

प्रताप उर्फ बब्बी अशोक खाकोडीया (२७ रा.गणेशवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास गोदाघाट परिसरात दिनदिक्कतपणे एक तरुण हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पंचवटी पोलिसांनी धाव घेतली असता, संशयितास गोदावरी हॉटेल समोर बेड्या ठोकण्यात आल्या. संशयिताच्या ताब्यात कोयता मिळून आला असून, अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.

Web Title: Koyatadhari arrested at Gangaghata